अभ्यास करण्याचे काही नियम:
• स्वतःवर विश्वास ठेवा आणि ध्येय ठरवा.
• वेळापत्रक बनवा व त्याप्रमाणे वागा.
• जे महत्त्वाचे आहे त्याच्यासाठी वेळ खर्च करा.
• चुकांना घाबरू नका. त्यातून बरेच काही शिकता येते.
• आपली जास्तीत जास्त बुद्धीमत्ता शैक्षणिक साधने बनविण्यासाठी वापरा.
• कमीत कमी वेळेत आपल्याला जास्तीत जास्त काम कसे करता येईल याचे व्यवस्थापन करायला शिका.
• वर्षभरातले रोजचे अभ्यासाचे वेळापत्रक बनवून त्याचे कटाक्षाने पालन करावे.
• २४ तासांपैकी ८ तास झोप + ६ तास शाळा + १ तास जेवण + १ तास इतर + २ तास खेळणे असं एकूण वेळापत्रक असलं तरी ५-६ तास उरतातच. हा वेळ पूर्णपणे मन लावून अभ्यासाला दिला तर वर्षभर अभ्यासाची छान तयारी होते.
• दिवसाचा सगळा वेळ नीट वापरला तर रात्री जागरण करून अभ्यास करण्याची वेळ येतच नाही.
• वेळापत्रकात प्रत्येक विषयाला वेळ दिलं गेला पाहिजे. अवघड वाटणाऱ्या विषयांना जास्त वेळ द्यावा.
• पाढे, सूत्रे, व आकृत्या यांना वेगळा वेळ देऊन विशेष तयारी करावी.
• उत्तरे पाठ करू नयेत. आपल्या भाषेत मुद्द्यांमध्ये प्रश्नांची उत्तरे लिहून काढावीत. इंग्रजीचे स्पेलिंग, अर्थ पाठ करावेत. विज्ञानाच्या व्याख्या पाठ कराव्यात. गणिते सोडवावीत. सखोलपणे तो धडा अभ्यासावा.
• आळस, अस्थिरता, तुलना व न्यूनगंड टाळा आणि ‘मला येतच नाही,’ असे न समजता ‘प्रयत्न केले तर मला नक्कीच येईल,’ ही पक्की भूमिका मनात बाळगा.
• टी.व्ही. मोबाईल, ऑडिओ, सी.डी. या गोष्टी पूर्णतः बंद असाव्यात.
• एकदा अभ्यासासाठी ठरवलेली वेळ दुसऱ्या कोणत्याही आणि कितीही महत्त्वाच्या कामाला देता कामा नये.
• अभ्यासाच्या वेळी फक्त अभ्यासच करावा. जेवण किंवा टी.व्ही. पाहणे असे दुसरे कोणतेही काम करू नये.
• आपल्याला अभ्यासासाठी असलेले एकूण विषय आणि अभ्यास करण्यासाठी लागणारा वेळ याचा मेल घालण्यासाठी वेळापत्रक तयार करणे आवश्यक असते.